|Saturday, December 15, 2018
You are here: Home » क्रिडा » अन् कांस्यजेत्या हरिशची पुन्हा चहाविक्री सुरु…

अन् कांस्यजेत्या हरिशची पुन्हा चहाविक्री सुरु… 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सेपाक टकराव या अनोख्या खेळात यंदा आशियाई स्पर्धेतील कांस्य जिंकणाऱया हरिश कुमारला दिल्लीत पोहोचल्यानंतर लागलीच आपल्या वडिलांच्या टपरीवर चहाविक्री सुरु करणे भाग पडले आहे. पदक जिंकल्यानंतर मदतीचा, बक्षिसांचा ओघ सुरु झाला आहे. पण, घर चालवण्यासाठी त्याला पुन्हा पूर्वीच्या उद्योगाकडे वळावे लागले आहे.

यंदा आशियाई स्पर्धेत भारताने 15 सुवर्णपदकांसह एकूण 69 पदके जिंकली. आशियाई स्पर्धेच्या इतिहासात ही संघाची सर्वोच्च कामगिरी ठरली. पण, हरिश कुमारसारखे काही पदकजेते खेळाडू अद्याप आर्थिक विवंचनेत आहेत.

‘माझ्या घरात बरेच सदस्य आहेत आणि कुटुंबाचे उत्पन्न अगदीच तुटपुंजे आहे. त्यामुळे, घर चालवण्यासाठी मला माझ्या वडिलांना चहाच्या टपरीवर मदत करावी लागते. मी स्वतः तेथे 2 ते 6 या वेळेत कार्यरत असतो. उज्ज्वल भवितव्यासाठी मला सर्वप्रथम चांगल्या नोकरीची गरज आहे’, असे तो वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला.

हरिशने 2011 मध्ये सेपाक टकराव सरावाला सुरुवात केली. हेमराज या त्याच्या प्रशिक्षकांनी यासाठी त्याला प्रेरणा दिली. हेमराज यांनी त्याला सर्वप्रथम भारतीय क्रीडा प्राधिकरणात नेले आणि त्यानंतर त्याला तेथे महिन्याकाठी किट, आर्थिक सहाय्य मिळत गेले. 2011 पासून त्याने सातत्याने सराव केला आणि आशियाई स्पर्धेत कांस्यही जिंकले. पण, घरी आर्थिक विवंचना असल्याने त्याला मायदेशी परतल्यानंतर पुन्हा चहाची टपरी गाठावी लागली आहे.

Related posts: