|Thursday, April 18, 2019
You are here: Home » क्रिडा » डोराडोस फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकपदी माराडोना

डोराडोस फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकपदी माराडोना 

वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरिस

अर्जेंटिनाचा माजी जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू दियागो माराडोनाची मेक्सिकोतील डोराडोस फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जागतिक फुटबॉल क्षेत्रामध्ये माराडोनाने 1986 साली अर्जेंटिना फुटबॉल संघाचे कर्णधारपद भूषविले होते. त्याने दोनवेळा फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाचे नेतृत्त्व केले होते. माराडोनाने आपल्या फुटबॉल कारकिर्दीत नेहमी 10 नंबरची जर्सी वापरली होती. त्यामुळे या क्षेत्रात 10 नंबरच्या जर्सीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. 57 वर्षीय माराडोनाने यापूर्वी बार्सिलोना आणि नापोली क्लबचेही प्रतिनिधीत्त्व केले होते. माराडोनाला कोकेनचे व्यसन असल्याने 2000 साली त्याची प्रकृती गंभीर झाली होती. उपचारानंतर माराडोनाच्या प्रकृतीमध्ये चांगलीच सुधारणा झाली. 15 सप्टेंबर रोजी माराडोना मेक्सिकोतील डोराडोस क्लबच्या प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेणार आहे.

Related posts: