|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गुणवत्ता शिष्यवृत्तीत ‘केआयटी’ प्रथम

गुणवत्ता शिष्यवृत्तीत ‘केआयटी’ प्रथम 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

कोल्हापूर इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉलेज ऑफ इजिनिअरींग (स्वायत्त),  कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती-2018 मध्ये ग्रामिण व्यवसायिक गटामध्ये अभियांत्रिकी विभागात प्रथम क्रमांक पटकाविला.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या समारंभात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, कुलसचिव विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे यांच्या हस्ते केआयटीचे संचालक डॉ. विलास कार्जिन्नी व अधिष्ठाता डॉ. महेश चव्हाण यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.

गेल्या 10 वर्षापासून केआयटी हे पारितोषिक सलग पटकावित आहे. या पारितोषिकाने केआयटीमध्ये दिले जाणारे शिक्षण व गुणवत्ता अधोरेखित झाले आहे. केआयटीने नॅक ‘ए’ मानांकन, तिनवेळा एनबीए मानांकन, विद्यापीठाची संलग्नता तसेच स्वायत्त दर्जा प्राप्त केला आहे. या यशामुळे विद्यार्थी व पालकांतून कौतुक होत आहे. या यशाबद्दल चेअरमन भरत पाटील, व्हाईस चेअरमन सुनील कुलकर्णी, सचिव दिपक चौगुले यांच्यासह सर्व विश्वस्तांनी अभिनंदन केले.