|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संचालक विश्वनाथ करंबळी यांचा राजीनामा

संचालक विश्वनाथ करंबळी यांचा राजीनामा 

प्रतिनिधी/ आजरा

आजरा साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक विश्वनाथ करंबळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. एल. हरेर यांच्याकडे सादर केला. साखर कारखाना निवडणूकीनंतर चेअरमन चराटी यांनी करंबळी यांना स्वीकृत संचालकपदी संधी दिली होती.

कारखान्याच्या 2016 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणूकीत करंबळी यांनी चराटी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून उत्तूर-मडिलगे गटातून निवडणूक लढविली होती. त्या निवडणूक करंबळी यांना विजयापर्यंत पोहोचता आले नाही. मात्र चराटी यांनी करंबळी यांना स्वीकृत संचालक म्हणून संधी दिली. त्यावेळी स्वीकृत संचालक संख्या किती व कोणाला संधी मिळणार यावरून जोरदार चर्चा झाली होती. गेली दोन वर्षे करंबळी यांनी स्वीकृत संचालक म्हणून काम पाहिले असून नुकताच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

याबाबत करंबळी यांच्याशी संपर्क साधला असता चेअरमन चराटी यांनी आपणाला संधी दिली. गेली दोन वर्षे आपण याठिकाणी काम केले. मात्र माझ्या घरगुती कामामुळे आपण पदाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.