|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » तारओहोळ मध्ये बुडून सिरसंगी येथील महिलेचा मृत्यू

तारओहोळ मध्ये बुडून सिरसंगी येथील महिलेचा मृत्यू 

प्रतिनिधी/ आजरा

सिरसंगी गावाजवळून वाहत असलेल्या तारओहोळमध्ये बुडून सिरसंगी येथील संगिता विष्णू कुंभार (वय 35) या महिलेचा मृत्यू झाला. मंगळवार दि. 4 रोजी सायंकाळी ही घटना घडली. याबाबतची वर्दी भाऊ संजय कुंभार यांनी आजरा पोलीसात दिली आहे.

याबाबत आजरा पोलीसातून मिळालेली माहिती अशी, संगिता मंगळवारीही नेहमीप्रमाणे शेताकडे गेली होती. शेतीची कामे आटोपून सायंकाळी घरी येताना ती हातपाय धुण्यासाठी तारओहोळ पात्रात उतरली असता तीचा बुडून मृत्यु झाला. या घटनेची नोंद आजरा पोलीसात झाली असून पुढील तपास पो. हे. कॉ. देसाई करीत आहेत.

 

Related posts: