|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आवडीच्या क्षेत्रात व्यक्तिमत्व घडते

आवडीच्या क्षेत्रात व्यक्तिमत्व घडते 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी व्यवस्थापन विकास आणि नेतृत्व कौशत्य महत्वाचे आहे. चांगले व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर आवडीचे क्षेत्र निवडा असा सल्ला प्रा. जयसिंगराव सावंत यांनी विद्यार्थ्यांना दिला. पयुर्वषण पर्व व्याख्यानमालेत ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर प्रा. जयसिंगराव सावंत बोलत होते.

दिगंबर जैन बोर्डिंगच्या वतीने स्व.आण्णासाहेब लठे पयुर्वषण पर्व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी प्रा. जयसिंगराव सावंत यांनी व्याख्यानमालेत व्यक्तिमत्व या विषयावर दुसरे पुष्प गुंफले. या कार्यक्रमाच्या अध्यस्थानी नगरसेवक रत्नेश शिरोळकर होते.

प्रा. जयसिंगराव सावंत म्हणाले, एखाद्या व्यक्तीची वैशिष्टये म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व होय.  अभिव्यक्ती, संवाद, कौशल्य यातून व्यक्तिमत्व घडते. माणूस समाजात कसा वावरतो यावरुन त्याचे व्यक्तिमत्व दिसून येते. अनुभवातूनही व्यक्तिमत्व घडते. पण चांगले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आवडीचे क्षेत्र निवडण्याचा सल्ला प्रा. सावंत यांनी विद्यार्थ्यांना दिला. व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी व्यवस्थापन विकास आणि नेतृत्व कौशल्य आवश्यक आहे. कौशल्य आपल्या ज्ञानावर अवलंबून आहे. तर नेतृत्व करताना सर्जनशीलता असायला पाहिजे. व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर नकारात्मक विचार बाजूला ठेवून सकारात्क विचार करण्याचा सल्ला दिला.नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी अध्यक्षीय भाषण केले.

स्वागत व प्रास्ताविक शुभम पाराज यांनी केले. पाहुण्यांचा परिचय संदीप पोमाई केला. दिगंबर जैन बोर्डिंगचे चेअरमन सुरेश रोटे यांच्या हस्ते नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांचा सत्कार करण्यात आला. सम्मेद पाटील यांनी आभार मानले. शिवप्रताप ठिकणे यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related posts: