|Friday, November 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संत निरंकारी सेवादल मदत पथक केरळला रवाना

संत निरंकारी सेवादल मदत पथक केरळला रवाना 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

निरंकारी सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आदेशान्वये संत निरंकारी चॅरिटेबल फौंडेशन जिल्हा कोल्हापूरचे मदत पथक एरनाकुलम (केरळ) ला रवाना झाले आहे. या पथकात क्षेत्रिय संचालक शहाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात पाटील, दत्तात्रय माळी, सिताराम पाटील यांच्यासह 164 सेवादल जवानांचे पथक दि.1 सप्टेंबर रोजी केरळ येथील मदत कार्यात दाखल झाले. 

संत निरंकारी मंडळाच्या वतीने यापुर्वीही संपूर्ण देशभरात रक्तदान शिबीरे, स्वच्छता अभियान, रेल्वे स्वच्छता अभियान, मोफत आरोग्य शिबीरे, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविले आहेत. याचाच एक भाग म्हणून केरळमध्ये पुरामध्ये झालेल्या नुकसानीमध्ये पुरग्रस्तांच्या मदतीसाठी हे मदत पथक रवाना झाले आहे. दि.9 सप्टेंबरपर्यंत हे पथक सेवा बजावणार आहे. या उपक्रमाला अमरलाल निरंकारी (क्षेत्रिय प्रभारी) व शाम लालवाणी यांचे सहकार्य लाभले आहे.

Related posts: