|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » भाजपाच्या फसव्या योजनांविरुद्ध ‘एल्गार’ करणार : चित्रा वाघ

भाजपाच्या फसव्या योजनांविरुद्ध ‘एल्गार’ करणार : चित्रा वाघ 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

भाजपा सरकार उज्ज्वला, अस्मिता योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिला व तरुणींची फसवणूक करीत असून आम्ही या योजनांच्या ’फसवेगिरी’ विरुद्ध एल्गार करणार असल्याचे सांगतानाच भाजपाचे आ. राम कदम यांनी राज्यातील जनतेची माफी मागितली, म्हणजे मेहरबानी केलेली नाही. राज्याला हराम ‘राम’ नको आहे, असा टोला महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी इस्लामपूर येथे बोलताना दिला.

  येथील राष्ट्रवादी भवनमध्ये तालुक्यातील महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद करताना त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सौ. छाया पाटील, तालुकाध्यक्षा सौ. सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा सौ. रोझा किणीकर, माजी नगराध्यक्षा सौ. अरूणा पाटील, कार्याध्यक्षा सौ. सुनीता देशमाने, प्रदेश सदस्या सौ. कमल पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

   चित्रा वाघ म्हणाल्या, उज्ज्वला योजनेतून सिलेंडर दिले जाते. तेव्हा रॉकेल बंद आणि आठशेच्यावर गेलेला सिलेंडर परवडत नाही, अशी अवस्था भगिनींची झाली आहे. अस्मिता योजनेतून मुलींना सॅनेटरी पॅड देण्याची पंकजा मुंडेंनी दीड वर्षापूर्वी घोषणा केली. आता कुठे-कुठे ते दिले जात आहे. आता युद्धाचे दिवस असून आपण महागाई सह सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात रान उठवा. समाजातील असंघटित, धुणी भांडीवाल्या महिलासह शिक्षिका, डॉक्टर, वकील आदी विविध क्षेत्रातील महिलांना पक्षात सामावून घ्या. आता गणेशोत्सव सुरू होईल, त्यानंतर दुर्गात्सव, दसरा, दिवाळी येणार आहे. मात्र पक्षासाठी आपणस वेळ द्यावा लागेल.

   आ. जयंतराव पाटील म्हणाले, महिलांनी कार्यकर्त्यांनी बूथ समित्यामध्ये सहभागी व्हावे. रिलायन्ससह परदेशात जादा गॅस निघत असल्याने सरकार मोफत सिलेंडर वाटत असून पूर्वी रु. 375 ला मिळणारा सिलिंडर रु.800 वर गेला आहे. महागाई व सरकारच्या चुकीच्या धोरणांनी जनता त्रस्त झाली आहे. आपण 8-10 बोलणाऱया महिलांची टीम तयार करून गावो-गावी छोटय़ा-छोटय़ा बैठका घेऊन हे सर्व त्यांच्या पर्यंत पोहचवा. आम्ही पक्षात कार्यक्षमता वाढविण्यावर भर दिला असून महिलासह विविध सेलच्या अध्यक्षांचा राज्य दौरा सुरू आहे. मीही आठ जिह्यांचा दौरा पूर्ण केला असून राज्यातील जनतेत या सरकारबद्दल प्रचंड राग आहे.

  सौ.छाया पाटील यांनी भाजपा सरकारचा समाचार घेतला. सौ. सुस्मिता जाधव म्हणाल्या, आम्ही ‘मायक्रो प्लानिंग मधून सामान्य माणसाचा विश्वास मिळविला आहे. शहराध्यक्षा सौ. रोझा किणीकर म्हणाल्या, भाजपाला राज्यघटना मान्य नसून त्यांना स्त्राr ही भोग वस्तू असल्याचे सांगणारी मनुस्मृती आणायची आहे. चित्रा वाघ या चित्राप्रमाणे सुंदर, आणि वाघाप्रमाणे डॅशिंग आहेत. सौ.अरूणा पाटील यांनी समाज संस्कार हरवत असल्याची खंत व्यक्त केली.

  सौ.उषा मोरे-पंडीत, सौ.अलका माने, प्रज्ञा पाटील, आशिफा बागवान, कु.अबोली पाटील, किरण सावंत यांनी आ.राम कदम यांचा शेलक्या शब्दात समाचार घेऊन वाळव्यात येण्याचे आव्हान दिले. पं.स.सदस्या सौ.रुपाली सपाटे, सौ.गीता पाटील यांचीही भाषणे केली.

   सौ.कमल पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्या दीपा देशपांडे, सौ.मेघा पाटील, सौ.सुवर्णा पाटील, सौ.धनश्री माने, श्रीमती सुनीता सपकाळ, सौ.सायली गोंदील, सौ.वैशाली पाटील, सौ.शोभा देसावळे, सौ.अरूणा जाधव, सौ.चारुलता पाटील, सौ.वैशाली निकम, सौ.अर्चना भोसले, सौ.वैशाली मंडले, सौ.नयना पाटील, सौ.सुजाता पाटील, सौ.शामल सावंत, सौ.रंजना पाटील, सौ.संगीता पाटील, तसेच प्रा.शामराव पाटील, विजयबापू पाटील, बाळासाहेब पाटील, शहाजीबापू पाटील, संग्राम पाटील, यांच्यासह मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या. सौ.सुनीता देशमाने यांनी आभार मानले.

Related posts: