|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » आ. राम कदम यांच्याविरोधात बार्शीत गुन्हा दाखल

आ. राम कदम यांच्याविरोधात बार्शीत गुन्हा दाखल 

प्रतिनिधी/ बार्शी

घाटकोपर येथे दहीहांडी कार्यक्रमप्रसंगी भाजपाचे आ. राम कदम यांनी महिलांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले. तरूणींना पळवून नेण्याची भाषा केली. शांतता भंग केल्याप्रकरणी आ. कदम यांच्याविरूद्ध बार्शी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे यांनी आ. कदम यांचेविरूद्ध तक्रार दाखल करताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

घाटकोपर येथे 3 सप्टेंबर रोजी दहीहांडी कार्यक्रमात आ. कदम यांनी भाषणावेळी महिलांचा अपमान व्हावा, या उद्देशाने प्रक्षोभक भाषण केले होते.

आ. कदम यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करून अपमान केला. मुलींची इच्छा नसेल तर लग्नासाठी पळवून आणु, चुकीचे असेल तर निश्चित मदत करणार हे कदम यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारी आहेत, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

बार्शी पोलिसात महिला जिल्हाध्यक्षा काळे यांनी फिर्याद देताच पोलिसांनी महिलांविषयी आक्षेपार्ह बोलणे, असा अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

तर शहरातील महात्मा गांधी व्यापारी संकूलाजवळ महिला व युवकांनी भाजपा आ. राम कदम यांच्या पुतळयास जोडामारो आंदोलन केले. यावेळी माजी नगराध्यक्षा मंगल शेळवणे, माजी नगरसेविका संगिता मेनकूदळे, ऍड. राजश्री डमरे, करूणा हिंगमिरे, मीना धर्माधिकारी, सविता जाधव, उल्का गायकवाड, युवक आघाडीचे राहुल देशमुख, विक्रमसिंह पवार, आकाश जावळे, अमोल पेंडलकर, प्रसाद माने, विवेक कदम, रविंद्र गुंड, आकाश पाटील, गणेश कुऱहाडे, अतूल साळुंखे, विक्रांत पवार, सागर माने, महेश घोलप, अक्षय ठाकरे, विकास बारबोले आदी उपस्थित होते.

भाजपा शासनाच्या निषेधार्थ तसेच भाजपा आ. कदम यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यकार्यांनी जोडोमारो आंदोलन केले.