|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » चंदुकाका सराफच्या मेगा ड्रॉमध्ये मालुसरे मारूती सियाझचे विजेते

चंदुकाका सराफच्या मेगा ड्रॉमध्ये मालुसरे मारूती सियाझचे विजेते 

प्रतिनिधी/ सातारा

1827 पासून शुध्द सोने, पारदर्शक व्यवहार व नाविन्यपूर्ण डिझाईन्स् यासाठी  प्रसिध्द असलेल्या चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. यांचे वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षासाठी ग्राहकांच्या आग्रहास्तव सौभाग्य अलंकार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  सौभाग्य अलंकार महोत्सवाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या अंतर्गत होणाऱया मेगा ड्रॉ सोडतीचा कार्यक्रम चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. च्या सांगली येथील श्री विष्णुदास भावे नाटय़सभागृहात झाला.

 यावेळी प्रख्यात अभिनेते भरत जाधव, चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. चे संचालक सिध्दार्थ शहा, सांगली येथील स्कायलार्क प्रेसिटेक प्रा. लि. चे उद्योजक भालचंद्र पाटील, प्रकाश कुंभोजकर, विजयकुमार सकळे, जयसिंगपूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा माधुरी चौगुले,  जैन महिला परिषदेच्या संचालिका मिना गोदे, आदिनाथ होसकल्ले, त्रिशला सुरेश पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी भरत जाधव यांचे पुन्हा सही रे सही या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. 

मेगा ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकाचे मारूती सुझुकी नेक्सा सियाझ डेल्टा कारचे भाग्यवान विजेते ठरले सातारा शाखेमध्ये खरेदी केलेल्या सर्जेराव मालुसरे,  तर  रॉयल इन्फील्ड बुलेटचे भाग्यवान विजेते ठरले सातारा शाखेमध्ये खरेदी केलेल्या जमदाडे आशा रमेश, कराड शाखेमध्ये खरेदी केलेल्या पाटील विजया हणमंतराव, सांगली शाखेमध्ये खरेदी केलेल्या. सर्व भाग्यवान विजेत्यांना चंदुकाका  सन्सच्या वतीने संपर्क करण्यात येईल, त्यांनी आपआपली बक्षिसे चंदुकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा. लि. च्या शाखांमधून घेऊन जावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.