|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तारगाव परिसरातील शेतकऱयांचा रेल्वे अधिकाऱयांना घेराव

तारगाव परिसरातील शेतकऱयांचा रेल्वे अधिकाऱयांना घेराव 

वाठार किरोली :

 जमिनीचा योग्य मोबदला मिळेपर्यंत रेल्वे दुहेरी करणाचे काम होऊन देणार नसल्याचा, इशारा तारगाव परिसरातील शेतकऱयांनी दिला आहे. शेतकऱयांच्या प्रश्नांना उडवाउडवीचे उत्तरे देणाऱया रेल्वे अधिकाऱयांना तारगाव रेल्वे स्टेशनवर संतापलेल्या शेतकऱयांनी घेराव घातला. याबाबतची अधिक माहिती, सध्या पुणे-मिरज रेल्वे दुहेरी करणाचे काम सुरु आहे. परंतु शेतकऱयांच्या जमिनीची मोजणी व संपादनाची कायदेशीर प्रक्रिया न करता तसेच कोणत्याही शेतकऱयांना जमिनीचा मोबदला न देता जमीन ताब्यात घेऊन रेल्वे दुहेरी करणाचे काम सुरु करण्यात आले आहे. यामध्ये रेल्वे लगत असणाऱया पिके व जमिनीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान करण्यात आले. शेतकऱयांना गुरूवारी सकाळी अकरा वाजता तारगाव रेल्वेस्टेशन येथे बोलवण्यात आले होते. परंतु रेल्वेचे अधिकारी शिंदे व तोरापे यांनी संपादीत केलेल्या जमीनीची कोणतीही कागदपत्र न दाखवता शेतकऱयांनी विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीचे उत्तरे देताच संतापलेल्या शेतकऱयांनी गोंधळ करीत रेल्वे अधिकाऱयांना घेराव घातला.

 

Related posts: