|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गुणवत्तेमुळेच आदर्श शिक्षक पुरस्काराची उंची वाढली

गुणवत्तेमुळेच आदर्श शिक्षक पुरस्काराची उंची वाढली 

जिल्हा परिषद प्रशासनाने केले होते नेटके नियोजन,

विशाल कदम/ सातारा

याची देही याची डोळा पहावा तो सोहळा, अशी वाक्य रचना फक्त विठ्ठू माऊलीच्या पालखी सोहळय़ात केल्याचे पहायला मिळते. परंतु सातारा जिह्याच्या शिक्षण विभागाने केलेल्या प्रगतीचा आलेख उंचावल्याने यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा ऐतिहासिक शाहुनगरीत पार पडला. या सोहळय़ाचे नियोजन सातारा जिल्हा परिषद प्रशासनाकडून व्यवस्थितरित्या पार पाडल्याने सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे कौतुक शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून झाले. विशेष म्हणजे मंत्री तावडे यांच्याकडून बारकाईने सर्व घडामोडीवर नजर होती. या पुरस्कार सोहळा पार पडेपर्यंत शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांचा डोळय़ाला डोळा लागत नव्हता. 

सध्या राज्य सरकार हे भाजपा-सेनेचे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिह्यात राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या सातारा जिल्हा परिषदेमध्ये राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्काराचे संयोजन करणे म्हणजे तशी अवघड बाब सत्ताधाऱयांसाठी होती. मात्र, तरीही राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी साताऱयातच घ्यायचा निर्णय घेतला. एक दिवसाचा मुक्काम पुस्तकाच्या गावात पार पडला. त्यानंतर साताऱयातील पुरस्कार वितरण सोहळा हा नेटका पडेल की काय, याकडे प्रसिद्धीमाध्यमांचीही करडी नरज होती. किरकोळ अपवाद वगळता हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. सातारा जिह्याच्या शिक्षण विभागाने केलेले बदल पाहून या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. राज्याचे तात्कालिन शिक्षण सचिव नंदकुमार यांनी वारंवार सातारा जिह्यात भेटी देवून शिक्षणाचा वाढता आलेख पाहिला होता. त्यामध्ये डिजीटल शाळा, ज्ञानरचनावाद यामुळेच प्रशासनाला ही भुरळ वाटली.

शिक्षण मंत्री विनोद तावडे हे शिक्षकांचेच होवून गेले

मंत्री म्हटल्यानंतर थोडेस सुरक्षा व्यवस्थेचे कडेकोट बंदोबस्त आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख अतिथी असलेले मंत्री विनोद तावडे हे शिक्षकांच्यामध्येच मिसळून होते. त्यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेत त्यांनाच आपल्या समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. तेच शिक्षक होवून गेल्याचा अनुभवही पुरस्कारार्थी शिक्षकांना आला.

शिक्षणाधिकाऱयांची अपार मेहनत

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्याकडे वरीष्ठ अधिकारी मम्हाणे यांनी जबाबदारी सोपवली होती. मम्हाणे यांनीही साताऱयाच्या दौऱयावर येवून याचे नियोजन पाहिले. हा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत क्षीरसागर यांच्या डोळय़ाला डोळा लागला नव्हता.

अधिकारीही व्यासपीठावरुन खाली

मान्यवर मंडळींची रेलचेल या कार्यक्रमात होती. सेलिब्रेटी मंडळी वगळता कोणीही व्यासपीठावर नव्हते. बैठक व्यवस्थेमध्येही सुक्ष्म नियोजन केले होते. जिल्हाधिकारी, शिक्षण संचालक यांच्यासह सर्वच अधिकाऱयांचे नियोजन केले होते. अधिकारी जरी व्यासपीठावरुन खाली असले तरीही हा कार्यक्रम शांततेत पार पाडला.