|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फोंडय़ाचा चतुर्थी बाजार बुधवार पेठ रोडवर

फोंडय़ाचा चतुर्थी बाजार बुधवार पेठ रोडवर 

प्रतिनिधी/ फोंडा

गणेश चतुर्थीच्या काळात भरणारा माटोळीचा बाजार यावर्षी बुधवार पेठ रोडवर  भरविणार असल्याची माहिती फोंडा पालीकेचे नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी दिली.  मागील दोन वर्षापासून वाहतूक समस्येमुळे भाजी मार्केटच्या पाठीमागे असलेल्या एअरपोर्ट रोडवर भरविण्यात येत होता. मात्र ग्राहकांची होणारी अडचड व काही नगरसेवकांनी जोर लावल्याने चतुर्थी बाजार नुतन मार्केट कॉप्लेक्ससमोर भरविण्यात पालिकेने परवानगी दिलेली आहे. यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करताना चारचाकी व अवजड वाहनांनासाठी विठ्ठल मंदिर ते भवानी सदन पर्यत वाहतूक दोन दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. माटोळी बाजारबाबत निर्णयाला उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी व शांताराम कोलवेकर यांनी नापसंती व्यक्त केली. त्यानंतर झालेल्या गरमागरम चर्चेनंतर फेंडा पालीकेच्या काल शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

  चतुर्थीच्या काळात होणारी वाहतुक समस्या लक्षात घेता फिरत्या व्यापाऱयाला फुटपाथवर व्यापार थाटता येणार नाही ही सर्व जागा वाहन पार्किगसाठी मोकळी राहणार आहे तसेच दुकानदाराना फुटपाथवर ताडपत्र्या किंवा अतिरिक्त मांडव घालता येणार नाही असा निर्णय पालीका मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी पालिका मुख्याधिकारी नवनाथ नाईक व इतर नगरसेवक उपस्थित होते. बांदोडा येथील काही घरबांधणीनंतरही नोंदी नसलेल्या घरांबाबत आलेल्या प्रश्नावर कर आकारण्यासाठी पंचायतीला ना हरकत दाखला देण्याचेही यावेळी एकमताने ठरविण्यात आले. शहरातील भटकी गुरे व कुत्र्याच्या उपद्रव रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याचा निर्णय बैठकीत झाला.