|Sunday, November 18, 2018
You are here: Home » Top News » लाडखेडजवळ भरधाव ट्रव्हल्सचा अपघात

लाडखेडजवळ भरधाव ट्रव्हल्सचा अपघात 

ऑनलाईन टीम / जळगाव :

यवतमाळमधील लाडखेडजवळ भरधाव ट्रव्हल्सने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षाचालकासह 14 विद्यार्थी जखमी झाले. यवतमाळ ते दारव्हा मार्गावरील लाडखेड बसस्थानकाजवळ आज सकाळी 7.30 वाजता ही घटना घडली.

पुणे येथून येणारी ट्रव्हल्स भरधावे वेगाने प्रवासी घेऊन चंद्रपूरकडे जात होती. याचवेळी दारव्हा तालुक्मयातील बानायत येथून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ऑटोरिक्षा बानायत येथून लाडखेडला जात होती. त्याचदरम्यान लाडखेड येथील बसस्थानकाजवळील पुलाजवळ ट्रव्हल्सने ऑटोरिक्षाला धडक दिली. या अपघातात ऑटोरिक्षातील 13 विद्यार्थी आणि चालक असे 14 जण जखमी झाले. त्यापैकी दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहे. अपघातातील जखमींना यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऑटोरिक्षा चालक सुभाष ठाकरे (38) जखमी असून त्यांचा मुलगा पूर्वेश सुभाष ठाकरे व धम्मा शिरसाट हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहे. अपघाता झाला त्यावेळी रस्त्याने शेळय़ांचा कळप जात होता. शेळय़ांना वाचविण्याच्या प्रयत्नात ऑटोरिक्षा चालकाने बाजूने मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी समोरून येणाऱया ट्रव्हल्सने ऑटोरिक्षाला धडक दिल्याने हा अपघात घडला. घटनास्थळी लाडखेडचे ठाणेदार सारंग मिराशी यांच्यासह पोलीस ताफा दाखल झाला. त्यांनी जखमींना उपचारार्थ हलविण्यास मदत केली.

Related posts: