|Friday, April 19, 2019
You are here: Home » Top News » त्वष्टा कासारची यंदा महाबलीपूरम मंदिराची प्रतिकृती

त्वष्टा कासारची यंदा महाबलीपूरम मंदिराची प्रतिकृती 

पुणे / प्रतिनिधी

पुण्यातील कासार समाज संस्थेकडून यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने यंदा 10 सप्टेंबरपासून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. मंडळातर्फे यंदा गणेशोत्सवात साकारण्यात आलेले चेन्नई येथील प्रसिद्ध महाबलीपूरम मंदिर गणेशभक्तांसाठी खास आकर्षण असणार आहे.

महाबलीपूरम मंदिराची प्रतिकृती प्रसिद्ध शिल्पकार सिद्धार्थ तातुसकर व त्यांच्या 13 सहकाऱयांनी 22 दिवसांत साकारली आहे. गणेशोत्सव काळात हे मंदिर गणेशभक्तांसाठी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुले असणार आहे. सोमवारी 10 रोजी दुपारी 4 वाजता संस्थेच्या श्रींची नगर प्रदक्षिणा निघणार आहे. मंगळवारी 11 रोजी सायंकाळी 7 वाजता महाबलीपूरम मंदिराच्या प्रतिकृतीचे पुण्याचे सह पोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या राधिका पुरोहित, अनुजा पुरोहित, नगरसेविका अनिता डाखवे उपस्थित रहाणार आहेत. संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शुद्ध चांदीचे 10 ग्रॅम वजनी नाणे तयार करण्यात आले आहे. 18 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता 1000 हून अधिक महिला सामूहिक अथर्वशीर्ष पठण सादर करणार आहेत. तर याचदिवशी सायंकाळी महिलांची सामूहिक महाआरती होणार आहे.

Related posts: