|Sunday, July 21, 2019
You are here: Home » leadingnews » नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने पायलटसह 6 ठार

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याने पायलटसह 6 ठार 

ऑनलाईन टीम / काठमांडू

नेपाळच्या गोरखा जिह्याहून काठमांडूला जाणारे हेलिकॉप्टर आज दुर्घटनाग्रस्त झाले. यामध्ये जपानच्या एका पर्यटकासह सहा जण ठार झाल्याची माहिती आहे. तर एका महिलेला वाचविण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नुवाकोट जिह्यातील सर्नचेत येथील घनदाट जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. पायलटसह सहा जण ठार झाले आहेत. गोरखाहून रुग्णाला काठमांडूला आणण्यात येत असताना ही दुर्घटना घडली. नेपाळच्या पोलिसांनी सांगितले की, हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला होता. शेवटचा संपर्क नुवाकोट आणि धडिंग जिह्याच्या सीमारेषेवर झाला होता. नेपाळच्या हवाई दलाने या हेलिकॉप्टरला सत्यवतीजवळ असल्याचे सांगितले. ही जागा घनदाट जंगलाने व्यापलेली आहे. तसेच 5500 फूट उंचीवर आहे.