|Friday, April 19, 2019
You are here: Home » Top News » पत्नीच्या डोक्यात पंखा मारून पतीने केली आत्महत्या

पत्नीच्या डोक्यात पंखा मारून पतीने केली आत्महत्या 

ऑनलाईन टीम / अकोला :

एका संतापलेल्या पतीने पत्नीच्या डोक्मयात पंखा मारून तसेच तीचे डोके भिंतीवर आदळून तीची हत्या केली तर स्वतःही गळफास लाउन आत्महत्या केल्याची घटना पिंजर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या दाबकी या गावात आज सकाळी घडली आहे. या प्रकरणी पिंजर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवीले.

राष्ट्रीय महामार्गावरुन जवळच असलेल्या बोरगाव खुर्द गावानजीक दाबकी हे गाव आहे. या गावातील सुनील मधुकर इंगळे व त्यांची पत्नी सुजाता सुनील इंगळे या दोघांमध्ये शुक्रवारी मध्यरात्री क्षुल्लक कारणावरुन वाद झाले. या वादातच संतापलेल्या सुनील इंगळे याने पत्नीला प्रथम पंखा फेकुन मारला, यामध्ये सुजाता जखमी झाल्यानंतर त्यांनी आरडा-ओरड केली असता सुनीलने तीचे डोके भिंतीवर आदळले. यामध्ये भिंतीवरील खीळा सुजाताच्या डोक्मयात घुसल्याने तीचा जागेवरच मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर घाबरलेल्या सुनील इंगळे याने स्वता गळफास लाउन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर शनिवारी सकाळी हा प्रकार शेजारच्यांच्या लक्षात आला. त्यांना दोघांचेही मृतदेह दिसल्याने पिंजर पोलीसांना माहिती देण्यात आली. पिंजरचे ठाणेदार नंदेकीशोर नागलकर यांच्यासह पोलीसांनी घटनास्थळावर धाव घेतली. घटनास्थळ पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठवीले. या प्रकरणी पतीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

Related posts: