|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात उद्या मुस्लिम समाजाचा मूकमोर्चा

पुण्यात उद्या मुस्लिम समाजाचा मूकमोर्चा 

पुणे / प्रतिनिधी

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पुण्यात उद्या (रविवारी) महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठय़ा संख्येने मुस्लिम बांधव तसेच विविध संस्था व संघटना सहभागी होणार आहेत.

पुण्यातील गोळीबार मैदान येथून सकाळी दहा वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे. कौन्सिल हॉल येथे या मोर्चाचा समारोप करण्यात येणार आहे. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा, संघटनेचा किंवा धर्माचा झेंडा नसेल. तर केवळ राष्ट्रध्वजच असणार आहे, असे समन्वयक अंजुम इनामदार यांनी सांगितले. मोर्चाला शेकाप, आरपीआय, सपा, बसपासह विविध संस्था व संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.

आपल्या प्रगतिशील व धर्मनिरपेक्ष देशात मुस्लिमांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. तसेच फुले-शाहु-आंबेडकर यांची विचारधारा जोपासणाऱया पुरोगामी महाराष्ट्रामध्येही मॉबलिंचिंगच्या घटना दिवसें-दिवस वाढत आहेत. त्या निषेधार्थ सकल मुस्लिम समाज बांधवांतर्फे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याला दलित पँथरचाही जाहीर पाठिंबा आहे, असे दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव सोनवणे यांनी शनिवारी जाहीर केले.