|Monday, April 22, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

रवि, गुरुचा अंशात्मक लाभयोग होत आहे.  नोकरीत महत्त्वाची कामे या आठवडय़ात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सोमवार, मंगळवारी जरी कामात थोडय़ाफार प्रमाणात अडचणी आल्या तरी जिद्द सोडू नका. यश नक्की मिळेल. व्यवसायात जुनी येणी वसूल करा. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्याने कुठेही पैसे गुंतवू नका. प्रॉपर्टीच्या व्यवहारात सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकहिताकरिता उचलेला मुद्दा गाजेल व चांगलीच प्रगती व प्रसिद्धी मिळवून देणारा ठरेल. वाहन जपून चालवा.


वृषभ

या आठवडय़ाच्या सुरुवातीला थोडा तणाव वाढणार आहे. थोडा रागही वाढेल. प्रत्येक प्रकरण संयमाने हाताळा. बुधवार, गुरुवार प्रकृतीची काळजी घ्या. प्रेमप्रकरणात सावध रहा. आपणास आवडणारी व्यक्ती खरोखरच आपल्याशी प्रामाणिक आहे याची खात्री करून घ्या. घरातील जबाबदारी स्वीकारावी लागेल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. वरि÷ आपले कौतुक कमी करतील. धंद्यात  भागीदारीत थोडे गैरसमज संभवतात. कोर्टकेसमध्ये सावध रहा.


मिथुन

नोकरी धंदा राजकारणात सोमवारपासून काही तापदायक मनाविरुद्ध घटना घडण्याचा संभव आहे. खरेखुरे समाजकार्य करणारी पिढी आता हळूहळू कमी होत चालली आहे. दोघांचे भांडण लावून स्वत:चा स्वार्थ कसा साधता येईल, यातच आता नातेवाईक काय, जवळचे लोक काय, पक्ष  हुशार झाले आहेत. पुढचा येणारा काळ कठीण आहे. त्याला तेंड देण्याकरिता आतापासूनच आध्यात्मिक शक्ति वाढविण्याचा प्रयत्न करा. स्वत:शी प्रामाणिक रहा. बुद्धिचातुर्याने प्रश्न सोडवता येतील.


कर्क

या आठवडय़ात आपण रेंगाळत पडलेली बरीच कामे मार्गी लावू शकाल. गैरमार्गाने पैसा मिळवणारे लोक आता वाढत चालले आहेत. पण माणसाने लक्षात ठेवले पाहिजे की, पैसा खूप मिळवला तरी आपण सोन्याचा बासमती खाऊ  शकतो का? पुढे येणारा काळ आपल्याला चांगला आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काही विषय गाजणार आहे. प्रसिद्धी मिळेल. विद्यार्थी वर्गाला यंदाच्या महत्त्वाच्या शालांत परीक्षेत चांगले गुण मिळू शकतात. प्रवासाचे बेत आखले जातील.


सिंह

आपला खर्च वाढवून कर्जाचा डोंगर उभारू नका. पुढे कठीण जाणार आहे. कला, क्रीडाक्षेत्रात मोठी संधी मिळेल, ती वाया जाऊ देऊ नका. राजकीय सामाजिक क्षेत्रात ठोस आश्वासने देऊ नका. पूर्ण करणे थोडे कठीण जाऊ शकते. या आठवडय़ात नवीन नोकरी मिळण्याची शक्मयता आहे. आताच्या काळात नोकरी नसेल तरी लवकरात लवकर  मिळेल ती संधी हातातून जाऊ देऊ नका. व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यासाठी थोरामोठय़ांचा सल्ला घ्या.


कन्या

आपण व्यवहारात हुशार असला तरी आपल्या हिताकरिता व कुटुंबाच्या  फायद्याकरिता आता प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काही दुष्ट लोक आपले नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील. लोकसंग्रह वाढवा. पुढे येणाऱया निवडणुकीकरिता आतापासूनच कामाला लागा. वेळ वाया घालवू नका. कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱया व्यक्तींना आताचा काळ महत्त्वाचा आहे. त्यामुळे संधीचा चांगला फायदा उठवला तर मोठी झेप घेता येईल.


तुळ

रविवार  मित्र  परिवाराबरोबर आनंदात जाणार आहे. सोमवारपासून नोकरीत, धंद्यात, कामाचा व्याप वाढणार आहे. घरातील कामाकडे थोडे दुर्लक्ष होण्याची शक्मयता आहे. येणाऱया सणांची तयारी करताना दगदग वाढेल. प्रकृतीकडे थोडे दुर्लक्ष होईल. गुरुवार, शुक्रवारी राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या. वरि÷ांशी बोलणी करून लवकरच आपले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा. कला क्रीडाक्षेत्रात नवीन कामे मिळतील. विद्यार्थीवर्गाने अभ्यासाकडे लक्ष द्यावे.


वृश्चिक

राजकीय, सामाजिक क्षेत्रात आता आपले महत्त्व अधिक वाढू लागणार आहे. शत्रुपक्षाचे कटकारस्थान उघडकीस आणू शकाल. लोकांचा विश्वास प्राप्त करण्याकडे लक्ष ठेवा. प्रामाणिकतेच्या मार्गावर अडचणी आल्या तरी मार्ग सोडू नका. पुढे येणारा काळ  आपणास चांगला आहे. यश नक्की मिळेल. ग्रहांच्या साथीने नवीन उच्चांक कुठल्याही क्षेत्रात गाजू शकाल. बुधवार, गुरुवारी जीवनसाथीबरोबर चहाच्या पेल्यातील वादळे संभवतात. घरातील कामांकडे लक्ष द्या. शेतकरी वर्गाने जबाबदारी घेऊन काम करावे. आळस करून चालणार नाही. पैसा जपून खर्च करा.


धनु

व्यवसायात महत्त्वाचे निर्णय लवकर घ्या. एखादा बदल किंवा नवीन तंत्रज्ञान वापरायचे असेल तर आताचा काळ चांगला आहे. साडेसाती चालू असली तरी अडचणीतून मार्ग सापडणार आहे. बसून राहून काही सिद्ध करता येणार नाही. विद्यार्थीवर्गाने अभ्यासाकडे जास्त लक्ष द्यावे. नाहीतर अपयश येईल. नोकरीत कामाचा ताण आठवडय़ाच्या शेवटी वाढण्याची शक्मयता आहे. सुटी न मिळाल्याने घरातील वातावरण थोडे तणावाचे होऊ शकते. शांतपणे प्रकरण हाताळा.


मकर

चंद्र, हर्षल प्रतियुती, चंद्र, गुरु युती होत आहे. पोळा हा बैलाचा सण आहे. त्यादिवशी कुणाच्याही बरोबर झुंज देत बसू नका. वेळ, शक्ति खर्च करू नका. धंद्यात वाद वाढवू नका. गिऱहाईकाशी प्रेमाने बोला. नोकरीत काम वाढेल. वरि÷ांची नाराजी होणार नाही याकडे लक्ष द्या. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांच्या पूर्णतेकडे लक्ष द्या. कार्य करा. कला, क्रीडाक्षेत्रात मेहनत करा. नाराज होऊ नका.


कुंभ

सूर्य, प्लुटो त्रिकोण योग. चंद्र, मंगळ केंद्रयोग होत आहे. श्रीगणेश उत्सवाची तयारी करतांना सोमवार, मंगळवार अडचणी येतील. रागावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. घरातील व्यक्तीचे सहकार्य उपयुक्त ठरेल. पूजन मात्र मनोभावे करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. मान- प्रति÷ा मिळेल. योजना पूर्ण करा. कला, क्रीडाक्षेत्रात प्रसिद्धी व पैसा मिळेल. परीक्षेत घवघवीत यश मिळेल.


मीन

चंद्र, मंगळ त्रिकोण योग, चंद्र, हर्षल प्रतियुती होत आहे. श्री विघ्नहर्त्याच्या पूजनाच्या दिवशी मनाची द्विधाअवस्था होईल. रागावर ताबा ठेवा. सामाजिक कार्यात नम्रतेने सर्वांच्या बरोबर वागा. पोलिसात प्रकरण जाऊ देऊ नका. राजकीय, क्षेत्रात वरि÷ांचा कल पाहून बोला. घरातील व्यक्तींच्यावर राग काढू नका. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. मोठे आश्वासन मिळेल. परीक्षेसाठी   अभ्यास करा. खाण्यापिण्याची काळजी घ्या. प्रेमप्रकरणात त्रास होईल.

 

Related posts: