|Friday, November 16, 2018
You are here: Home » क्रिडा » कोहलीची गैरहजेरी पाकला फायदेशीर

कोहलीची गैरहजेरी पाकला फायदेशीर 

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

संयुक्त अरब अमिरातमध्ये खेळविलेल्या जाणाऱया सहा देशांच्या आशिया चषक वनडे क्रिकेट स्पर्धेत कर्णधार कोहलीला विश्रांती देण्यात आली असल्याने त्याची गैरहजेरी पाक संघाला अधिक फायदेशीर होईल, असा विश्वास वेगवान गोलंदाज हसन अलीने व्यक्त केला आहे.

ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमधील दुबई आणि अबु धाबीमध्ये खेळविली जाणार आहे. पाक आणि भारत या दोन पारंपारिक संघामधील लढत बऱयाच दिवसानंतर होणार असून हा सामना 19 सप्टेंबरला खेळविला जाईल. 2017 साली इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकने भारताला पराभूत केले होते. या पराभवाची आठवण निश्चितच यावेळी भारतीय संघाला होईल. या अंतिम सामन्यात हसन अलीने आपल्या 6.3 षटकांत 19 धावांत भारताचे 3 गडी बाद करून आपल्या संघाला जेतेपद मिळवून दिले होते.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतील अंतिम फेरीच्या सामन्यातील पराभव आणि नियमित कर्णधार कोहलीची गैरहजेरी यामुळे पाकच्या तुलनेत भारतीय संघावर अधिक मानसिक दडपण राहील, असे प्रतिपादन हसन अलीने केले आहे.

विराट कोहली हा जगातील दर्जेदार फलंदाज म्हणून ओsळखला जातो. त्याला मॅच विनर म्हणून ओळखले जाते. पण पाक संघाला या आगामी स्पर्धेत बेफीकीर म्हणून चालणार नाही. कोहलीच्या गैरहजेरीतही भारतीय संघ हा दर्जेदार असून त्या संघात अन्य काही दर्जेदार खेळाडू असल्याचे हसन अलीने म्हटले आहे. आयसीसीच्या वनडे गोलंदाजांच्या मानांकन यादीत सध्या 24 वर्षीय हसन अली तिसऱया स्थानावर आहे. त्याने 33 वनडे सामन्यात 68 बळी मिळविले आहेत. विराट कोहलीशी आपली तुलना करू नका कारण कोहलीला मी ज्येष्ठ खेळाडू म्हणून ओळखतो, असेही हसन अलीने शेवटी म्हटले आहे.

Related posts: