|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » सुरेश रैनाऐवजी आकाशदीप नाथकडे नेतृत्व

सुरेश रैनाऐवजी आकाशदीप नाथकडे नेतृत्व 

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तरप्रदेश रणजी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदावरून सुरेश रैनाला डच्चू देण्यात आला असून त्याच्या जागी आकाशदीप नाथची नियुक्ती करण्यात आली आहे. 2017 च्या क्रिकेट हंगामात रैनाची कामगिरी चांगली झाली नसल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे.

गेल्या वर्षीच्या रणजी हंगामात उत्तरप्रदेश नेतृत्व करताना सुरेश रैनाने 9 डावात 105 धावा जमविल्या होत्या. आकाशदीप नाथने 43 धावांच्या सरासरीने 387 धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे उत्तरप्रदेशच्या निवड समितीने 2018-19 च्या रणजी हंगामासाठी 25 वर्षीय आकाशदीप नाथकडे कप्तानपदाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला आहे पण 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत उत्तरप्रदेशचे नेतृत्व सुरेश रैना करणार आहे.

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील उत्तरप्रदेशचा पहिला सामना 19 सप्टेंबरला सौराष्ट्रविरूद्ध, दुसरा सामना 21 सप्टेंबरला छत्तीसगड विरूद्ध, तिसरा सामना 23 सप्टेंबरला ओदिशा विरूद्ध, चौथा सामना 24 सप्टेंबरला दिल्लीविरूद्ध, पाचवा सामना 28 सप्टेंबरला हैदाबाद विरूद्ध, सहावा सामना 30 सप्टेंबरला मध्यप्रदेश विरूद्ध, सातवा सामना 4 ऑक्टोंबरला केरळ विरूद्ध तर आठवा सामना 6 ऑक्टोंबरला आंध्रप्रदेशविरूद्ध होईल. या स्पर्धेच्या बाद फेरीला 14 ऑक्टोबरपासून प्रारंभ होईल. आगामी रणजी हंगामात उत्तरप्रदेशचा पहिला सामना 1 नोव्हेंबरपासून गोवा संघाविरूद्ध खेळविला जाईल.