|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राम कदम यांना बांगडय़ांचा आहेर

राम कदम यांना बांगडय़ांचा आहेर 

जिजाऊ बिग्रेडतर्फे कदम यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी

प्रतिनिधी/ कोल्हापूर

मुंबई येथील दहीहंडीच्या कार्यक्रमात तरूणांसमोर बोलताना महिलांचा अपमान करणारे वक्तव्य भाजप आमदार राम कदम यांनी केले. या वक्तव्याच्या निषेधार्थ जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने राम कदम यांना बांगडय़ाचा आहेर देवून, जोडे मारण्यात आले. कदम यांचा आमदार पदाचा राजीनामा घ्यावा, अशी सरकारकडे मागणी करण्यात आली. कदम यांच्या निषेधार्थ केलेल्या घोषणाबाजीने शिवाजी पुतळा परिसर दणाणून गेला होता. 

जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा डॉ. जयश्री चव्हाण म्हणाल्या, मनूवादी भाजप आमदारांकडून वारंवार महिलांचा आपमान केला जात आहे. राम कदम यांनी एखादी मुलगी आवडत असेल तर सांगा, मी पळवून आणून तिच्याशी तुमचे लग्न लावून देईन, असे बेताल वक्तव्य केले. यापूर्वीही बापट, दानवे, छिंदम आदींनी असे वक्तव्य करून, समाजातील वातावरण दुषित केले आहे. सरकार मात्र बघ्याची भूमिका घेवून अप्रत्यक्षपणे त्यांना पाठीशी घालत आहे.

यावेळी रंजना पाटील, चारूशिला पाटील, आयेशा खान, वैशाली जाधव, सुनंदा चव्हाण, सारिका पाटील, जयश्री जाधव, शैला बाबर, सीमा सरनोबत, मीना नलवडे, विमल कोरे, आक्काताई चव्हाण, अलका देवाळकर, सायरा शेख, कार्तिकी जाधव, रतन शेटके, दिपा माळी, शोभा पाटील, सीमा काळे आदी उपस्थित होते. 

Related posts: