|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » महापालिका आरोग्य सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा

महापालिका आरोग्य सेवक सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

महापालिका आरोग्य सेवक सहकारी पतसंस्थेच्या गेल्या पाच वर्षातील प्रगतीचा आलेख पाहता संस्थेने उत्तरोत्तर प्रगती केल्याचे प्रतिपादन मनपा कर्मचारी संघाचे सचिव बाबुराव ओतारी यांनी आरोग्य विभाग सेवक सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सेवानिवृत्त  सभासदांचा सत्कार करण्यात आला.  संस्थेचे सहाय्यक चिटणीस मोहन पाटील यांनी अहवाल सादर केला. सभासदांच्या प्रश्नांना अध्यक्ष दिनकर आवळे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

संस्थेचे अध्यक्ष दिनकर आवळे अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे चिटणीस मोहन पाटील यानी अहवाल, हिशेबी पत्रके, अंदाजपत्रक, लेखा परीक्षण अहवालसादर केला. यावेळी अध्यक्षांनी सभासदांना 14 टक्के डिव्हिडंड देण्याचे जाहीर पेले.  दिलीप चौगुले, धनंजय साठे, सिकंदर सोनुले, रमेश बिरांजे आदी उपस्थित होते.

Related posts: