|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम शिक्षक करतात : अशोकराव फराक्टे

विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम शिक्षक करतात : अशोकराव फराक्टे 

वार्ताहर/ कसबा बावडा

विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम शिक्षक करतात. असे मत क।। वाळवेचे सरपंच अशोकराव फराक्टे यांनी व्यक्त केले. ते कसबा बावडा येथील भाई माधवरावजी बागल प्रशालेत शिक्षक दिन व वा. वि. वडेर स्मृतिदिन कार्यक्रमात बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष विलास साठे हेते.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करणेत आले. इयत्ता 10 वी त गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरवण्यात आले. यावेळी वा. वि. वडेर स्मृतिदिनानिमित्त रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका ए. एस. नवाळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. ए. माने यांनी तर आभार आर. व्ही. कुंभार यांनी मानले. सदर कार्यक्रमास संस्था सचिव विरेंद्र वडेर, उपाध्यक्ष चंद्रकांत देवताळे, गजानन सावंत, नामदेव पाटील आदी शिक्षकांसह पालक, विद्यार्थीनी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

 

Related posts: