|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » भाषेवर प्रभुत्व असल्यास माध्यमांमध्ये संधी

भाषेवर प्रभुत्व असल्यास माध्यमांमध्ये संधी 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  ज्या विद्यार्थ्याकडे भाषिक कौशल्य आहे, त्यांना माध्यमांमध्ये रोजगारांची संधी आहे, असे मत डॉ. रफिक सुरज यांना मांडले. न्यू कॉलेज मराठी भाषा आणि साहित्य मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. व्ही. नलवडे होते.

 सुरज म्हणाले, विद्यार्थ्यानी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून भाषिक कौशल्ये विकसित करावीत. प्राचार्य नलवडे म्हणाले, कोणत्याही विषयाचा गाभा समजावून घेण्यासाठी उत्तम आकलन गरजेचे आहे. त्यासाठी मातृभाषेचे ज्ञान चांगले असले पहिजे.

 प्रा. गुंडोपंत पाटील यांनी स्वागत केले. ऋतुजा निकम, आरती पोवार यांनी सुत्रसंचालन केले. सई हांडेने आभार मानले. यावेळी प्रा. सी. सी. चव्हाण, प्रा. प्रकाश निकम, प्रा. डॉ. सुनिता कांबळे, प्रा. मनिषा नायकवडी उपस्थित होते.