|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘तरुण भारत’च्या देखावा स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण

‘तरुण भारत’च्या देखावा स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

‘तरुण भारत’ आयोजित व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी आणि अल्ट्राटेक सिमेंट प्रायोजित गणेशोत्सव देखावा स्पर्धा 2017 चा बक्षीस वितरण समारंभ शुक्रवारी येथील शाहू स्मारक भवन मध्ये दिमाखात झाला. याप्रसंगी महापौर शोभा बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या मंडळांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

बक्षीस वितरण सोहळय़ाला आमदार चंद्रदीप नरके, उपमहापौर महेश सावंत,  नगरसेवक किरण नकाते, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे विभागीय व्यवस्थापक शांतनू चंदा, लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे संचालक गजानन धामणेकर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. 

 गणेशोत्सव काळात मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या कल्पकता आणि कार्याला वाव मिळावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ‘तरुण भारत’ने आजवर नेहमीच पुढाकार घेतला आहे. याच भावनेतून ‘तरुण भारत’च्यावतीने गेल्या अकरा वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. शहरातील बहुतांशी मंडळे या स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. 2017च्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेमध्ये शहरातील तब्बल दोनशेहून अधिक मंडळांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली होती.

 सजिव, तांत्रिक आणि प्रबोधनात्मक देखावानिहाय पहिल्या तीन विजेत्या मंडळांसह, उत्तेजनार्थ बक्षीस विजेत्या मंडळांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ट मूर्तीकारांसह, उत्कृष्ट सजावटीसाठीही मंडळांना रोख रकमेच्या बक्षिसांनी सन्मानित केले. यावेळी विजेत्या मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात एकच जल्लोष केला.