|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » स्वच्छ भारत सर्वेक्षण : सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

स्वच्छ भारत सर्वेक्षण : सोलापूर जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव 

प्रतिनिधी/ सोलापूर

स्वच्छ भारत सर्वेक्षण 2018 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेने देशात व राज्यात दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल तसेच संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिह्यातील पाडळी, भागाईवाडी, सुस्ते व निमगाव ग्रामपंचायतीचा आज औरंगाबाद येथे विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. औरंगाबाद (संभाजीनगर) येथील सिडकोमधील संत तुकाराम महाराज नाटय़गृहात राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर, पाणीस्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव अभय महाजन, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, हिवरे बाजारचे प्रणेते पोपटराव पवार, अवर सचिव एकनाथ मोरे प्रमुख उपस्थित होते.

  संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये 2016-17 मध्ये प्रथम पुरस्कारप्राप्त पाडळी, द्वितीय पुरस्कारप्राप्त भागाईवाडी, तृतीय पुरस्कारप्राप्त सुस्ते (ता. पंढरपूर) व निमगाव ते.(ता. माढा) या ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांचा हरिभाऊ बागडे व लोणीकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. भागाईवाडीच्या सरपंच कविता घोडके-पाटील, तावशीच्या सरपंच सोनाली यादव, ग्रामसेविका ज्योती पाटील, ग्रामसेविका सुवर्णा घोडके, सरपंच बाळासाहेब लोहकरे, निमगाव टे.चे ग्रामसेवक सतीश धायगुडे, पाडळीचे ग्रामसेवक सुसेन ननावरे यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

  स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये 31 ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 ची मोहीम घेण्यात आली होती. यामध्ये विशेष कामगिरी करणाऱया जिह्यांचा गौरव करण्याची घोषणा लोणीकर यांनी केली होती. त्यानुसार देशात व महाराष्ट्रात सोलापूर जिह्याने विशेष कामगिरी करुन सेक-18 या मोबाईल ऍपवर 1 लाख 74 हजार ग्रामस्थांचे अभिप्राय घेऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हरिभाऊ बागडे व बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि विजय लोंढे व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

  सोलापूर जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2018 ची विशेष मोहीम घेण्यात आली होती. त्यामुळे सोलापूर जिह्यास हे यश प्राप्त झाले आहे. सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे व उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनी अभिनंदन केले. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने राज्यस्तरावर ‘स्वच्छ संकल्पसे स्वच्छ  सिध्दी’ या अभियानाच्या काळात ग्रामसेवक फ्ढाउंडेशनच्यावतीने तयार केलेल्या चुलबंद या लघू नाटकातील अभियानाबद्दल ग्रामसेविका ज्योती पाटील यांचाही व त्यांच्या टीमचा सन्मान करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापनाचे विशेष कौतुक उत्तर सोलापूर तालुक्यातील ओला कचरा व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी आकर्षक डस्टबीन कापडी प्लॅस्टिक बंदीचा संदेश देणारे लोकार्पण पाणीपुरवठामंत्री  यांच्या हस्ते करण्यात आले. या विशेष उपक्रमाचे प्रणेते शिवाजी घोडके-पाटील तसेच सरपंच कविता घोडके-पाटील, तावशीच्या सरपंच सोनाली यादव यांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.

 पाटील दाम्पत्याने भागाईवाडी आणली देशपातळीवर

उत्तर सोलापूर तालुक्यातील भागाईवाडी हे शेवटचे गाव. या गावची स्थिती तशी काही वर्षांपर्यंत अंदमान निकोबार बेटाप्रमाणेच. पण गावच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या येथील सरपंच कविता घोडके-पाटील तसेच विकास रत्न, विशेष उपक्रमांचे प्रणते व पत्रकार शिवाजी घोडके-पाटील या दाम्पत्याने गावात हटके उपक्रम राबवून छोटे असलेले गाव देशपातळीवर विकासाचा पॅटर्न म्हणून आणले आहे.

Related posts: