|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिक्षकांचे कार्य नेहमीच आदर्शवतः दीपक प्रभावळकर

शिक्षकांचे कार्य नेहमीच आदर्शवतः दीपक प्रभावळकर 

वार्ताहर / शाहूपुरी

मंगळवार पेठेतील प्रभाग क्रमांक 17 मध्ये ज्ञानगंगा विद्यामंदिर न. पा. शाळा क्रमांक 6 संकुलात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून सातरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, ‘तरुण भारत’चे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर, माजी नगरसेवक कल्याण राक्षे, प्रा. सुरेश गायकवाड, जयवंत ढाणे, हेमंत बोपर्डीकर, प्रभाकर जाधव, संजय खांडेकर, सतीश कुलकर्णी, सिध्दार्थ सालीम यांची उपस्थिती होती.

  यावेळी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.   दीपक प्रभावळकर म्हणाले, शिक्षक हा समाजाचा कर्ता असतो. शिक्षकांना प्राचीन काळापासून गुरुचे स्थान देण्यात आले आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांना परिपूर्ण घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. म्हणून सर्वांनी शिक्षकांना आदर दिला पाहिजे. असे ते म्हणाले. सुहास राजेशिर्के म्हणाले, सातारा शहरातील सर्व नगरपालिकेच्या शाळांचा सर्वांगीण विकास करणार तसेच आयएसओ मानांकन मिळवण्यासाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दीपक प्रभावळकर, सुहास राजेशिर्के यांच्या हस्ते अमोल गिरीगोसावी, चैताली देशमुख, लता घनवट, वर्षा मोरे, किरण चोरगे, मोनिता भंडारे, वसुधा धुमक, ओंकार देवकर या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

   यावेळी मुख्याध्यापक कविता बनसोडे, प्रकाश नारकर उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन शाळा व्यवस्थापन समितीचे नंदकुमार माने यांनी केले.

Related posts: