|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पारधी समाजाच्या नावे ‘8 अ’च्या नोंदी घाला

पारधी समाजाच्या नावे ‘8 अ’च्या नोंदी घाला 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुक्यात गेले अनेक वर्षापासून पारधी समाज शासकीय जागेत पत्र्याच्या शेडमध्ये रहात आहे. शासन निर्णयानुसार नोंदी करण्यात याव्यात. शासकीय निर्णयानुसार नोंदी करण्यात याव्यात शासकीय जागेत रहात असलेल्या जागेवरती 8 अ च्या नोंदी करुन शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदन देताना उमेश चव्हाण, अशोक भोसले, भाईजा भोसले, संतोष भोसले, दिया भोसले, अमर भोसले, संजय भोसले, टोंग्री भोसले यांच्यासह उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पारधी समाज सातारा तालुक्यात गेली अनेक वर्ष स्थायिक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळूनही आज 72 वर्ष झाली. संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. मुलभूत सुविधा देण्यासाठी शासनाने विविध योजना असतात. या समाजाला आजही शौचालय, लाईट, पाणी व इतर सुविधा आजपर्यंत मिळालेल्या नाहीत. म्हणून आपणाला शासनाच्या निर्णयानुसार पारधी समाज रहात असलेल्या शासकीय जागेवरती त्यांना तात्काळ या सुविधा देण्यात याव्यात. सातारा तालुक्यातील पारधी सुविधा मिळण्यासाठी गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावढे यांना तसे आदेश देण्यात यावेत. गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी निवेदन दिले होते. त्यामध्ये मागण्या केल्या होत्या. परंतु त्या निवेदनानुसार गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीकडून कोणतीही कार्यवाही केली नाही. याप्रश्नी लक्ष घालून नेंदी करण्यात याव्यात सुविधा देण्यात याव्यात, सातारा तालुक्यात आरफळ येथे आठ कुटुंबे, थरथरवाडी येथे एक, मालगाव येथे दोन कुटुंबे, नागठाणे येथे एक, लिंबखिंड येथे एक, कोंडवली येथे तीन, जिहे येथे 9 कुटुंबे, देगाव येथे दोनण्, वडूथ येथे दोन, चिंचणेर येथ 2, पाटखळ येथे 1 अशी कुटुंबे पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्याला आहेत. शासनाने त्यांच्या नावे ती जागा करावी, अशी विनंती करण्यात येत आहे.