|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » नारायण तळावलीकर यांचे निधन

नारायण तळावलीकर यांचे निधन 

वार्ताहर/ मडकई

वाडी-तळावली पंचायतीचे माजी सरपंच, विद्यमान पंचसदस्य तथा कंदब महामंडळाचे संचालक नारायण उर्फ नाना शेणवी तळावलीकर (64) यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी सायंकाळी कामानिमित्त ते नवी दिल्ली येथे गेले होते. तेथील एका मॉलमध्ये खरेदी करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यांना तातडीने इस्पितळात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. 

आज रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी तळावली येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर 11 वा. स्थानिक स्मशानभूमित अंत्यसंस्कार होतील. त्यांच्यापश्चात पत्नी अमिता, पुत्र हर्षल, स्नुषा श्रेया व दोन नातू असा परिवार आहे. पत्नी अमिता या जीव्हीएमच्या बांदोडा येथील आरपीआरएस हायस्कूलमध्ये मुख्याध्यापिका आहेत. खांडेपार येथील उद्योजक व समाजसेवक संदीप खांडेपारकर यांचे ते भाओजी होत.

नारायण हे नाना तळावलीकर म्हणून ओळखले जात. सन 2002 ते 2007 या काळात ते वाडी तळावली पंचायतीचे सरपंच होते. तीनवेळा ते पंचसदस्य राहिले आहेत. सन 2017 मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत प्रभाग 7 मधून ते बिनविरोध निवडणून आले होते. मंत्री सुदिन ढवळीकर यांचे ते जवळचे मित्र होते. त्यांच्या अकाली निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.