|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मुलांना योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक करीत असतातः मंत्री गोविंद गावडे

मुलांना योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक करीत असतातः मंत्री गोविंद गावडे 

प्रतिनिधी / पणजी

शिक्षक हा प्रांजळ मनाचा असतो, तो मुलांचे सुक्ष्म गूण हेरुन त्यांना जिवनात योग्य दिशा देण्याचे काम करत असतो. त्यामुळे शिक्षकांचा गौरव म्हणजे त्यांना त्यांचे काम करण्यासाठी मिळणारे प्रोत्साहन आहे. शिक्षक हे नविन दर्जेदार पिढी घडविण्याचे काम करत असतात. असे प्रतिपादन कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी केले.

पणजी येथे कला व संस्कृती संचालनालय येथे अविष्कार सोशल ऍण्ड एज्युकेशनल फौंडेशन, कोल्हापूर यांच्यातर्फे शिक्षक दिनानिमित्त आयोजित ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2018’ कार्यक्रमात प्रमुख पाहूणे या नात्याने मंत्री गोविंद गावडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळर्णकर, फौंडेशनचे संस्थापक संजय पवार, गोवा प्रमुख प्रदिप नाईक व समन्वयक विजय केळकर उपस्थित होते.

शिक्षकांना सन्मानित करण्याची जी प्रथा या अविष्कार संस्थेतर्फे सुरु करण्यात आली आहे, ती अदभूत आहे. अशाप्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. नविन पिढी घडवण्याचे काम किती कठीण आहे हे फक्त शिक्षक जाणू शकतो. कारण कुंभार जो असतो तो फक्त निर्जीव वस्तूंना आकार देत असतो. परंतु शिक्षक सजीवांना आकार देण्याचे महत्वाचे काम करत असतो. या काळात त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. संघर्ष करावा लागतो. तरी देखील यावर मात करत ते नेहमी आपले काम करत राहतात. असे मंत्री गोविंद गावडे यांनी पूढे बोलताना सांगितले.

गोव्यात अशाप्रकारचा कार्यक्रम बाहेरील राज्यातील संस्था आयोजित करत असल्याने अत्यंत आनंद होत आहे. मी स्वतः एक शिक्षक असल्यामुळे शिक्षकांचे जिवन मी जगलो आहे. शिक्षकी पेक्ष्यामध्ये किती परिश्रम करावे लागतात हे मला माहीत आहे. शिक्षकांचा सन्मान हा त्यांचा कामाचा सन्मान आहे. असे मत गुरुदास पिळर्णकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमात सुमारे 40 शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सुनिता दयानंद केदार यांना कै. आर्वे गुरुजी स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार 2018 प्राप्त झाला. दरम्यान संस्थापक संजय पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले.

Related posts: