|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आनंद अप्पुगोळ याला सीआयडीची नोटीस

आनंद अप्पुगोळ याला सीआयडीची नोटीस 

चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना

प्रतिनिधी/ बेळगाव

येथील संगोळ्ळी रायण्णा को-ऑप. सोसायटीच्या माध्यमातून झालेल्या फसवणूक प्रकरणी गेल्या दोन दिवसांपासून सीआयडीचे अधिकारी बेळगाव येथे तपास करीत आहेत. सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पुगोळ याला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस सीआयडीच्या अधिकाऱयांनी बजावली आहे.

पोलीस उपअधिक्षक पुरुषोत्तम यांच्या नेतृत्वाखालील एक पथक दोन दिवसांपासून बेळगावात तळ ठोकून आहे. सोसायटीचे संचालक, गुंतवणूकदार, इमारत मालक आदींची जबानी घेण्याचे काम सुरु आहे. सीसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना आनंद अप्पुगोळ यांना करण्यात आली होती.

मात्र बेंगळूर येथील सीआयडी कार्यालयात आपण चौकशीसाठी येणार असल्याचे त्यांनी आपल्या वकिलांकरवी अधिकाऱयांना माहिती दिली आहे. शनिवारी दिवसभरही गुंतवणूकदारांकडून एकंदर प्रकरणाची माहिती घेण्याचे काम अधिकाऱयांनी सुरु ठेवले होते. रविवारी या पथकातील अधिकारी बेंगळूरला रवाना होणार आहेत.

276 कोटीच्या घरात फसवणूकीचा आकडा पोहोचला आहे. ऑडीट रिपोर्टवरुन सीआयडीला यासंबंधी माहिती मिळाली आहे. आता कागदपत्रांची पडताळणी करण्याबरोबरच थेट चौकशीला सुरुवात झाली आहे. हे पथक पुन्हा बेळगावला येणार आहे. अनेक संबंधितांना नोटीसा पाठवून त्यांची जबानी घेण्याचे काम दोन दिवस सुरु होते.