|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ट्रक-कार अपघात, तिघे ठार

ट्रक-कार अपघात, तिघे ठार 

विजापूर-बेळगाव राज्य महामार्गावरील दुर्घटना : मृत विजापूर जिह्यातील

जमखंडी/वार्ताहर

ट्रक-ओम्नी कारची समोरासमोर धडक होऊन कारमधील तिघेजण ठार झाले. ही घटना शनिवार 8 रोजी बागलकोट जिह्यातील मुधोळ येथील विजापूर-बेळगाव राज्य महामार्गावरील के. आर. लक्कम शाळेजवळ घडली. कासिमसाब मुजावर (वय 42), अफ्रिना कासिमखान मुजावर (35), शबाना नूरअहमद (वय 40) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी, शनिवारी विजापूर जिह्यातील कलकेरी येथील मजूर गोव्याहून आपले काम आटोपून ओम्नी कारने परतत होते. दरम्यान ट्रक विजापूरहून गोव्याकडे जात होता. त्यावेळी मुधोळ येथील के. आर. लक्कम शाळेजवळ दोन्ही वाहने आली असता समोरासमोर त्यांच्यात धडक झाली. यात कासिमसाब, अफ्रिना व शाबाना हे तिघेजण जागीच ठार झाले. तसेच ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. यावेळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.

या घटनेची माहिती मिळताच बागलकोट जिल्हा पोलीसप्रमुख सी. बी. रिषंत, जमखंडीचे डीवायएसपी रामनगौडा हट्टी यांनी सहकाऱयांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवून देण्यात आले. या घटनेची नोंद मुधोळ पोलिसात झाली आहे.

Related posts: