|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » इंधन दरवाढीविरोधात उद्या देशव्यापी बंद

इंधन दरवाढीविरोधात उद्या देशव्यापी बंद 

प्रतिनिधी / बेळगाव

पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठय़ा प्रमाणात वाढू लागल्याने सोमवार दि. 10 रोजी देशव्यापी बंदचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्ष संघटनांनी हा बंद पुकारला असून त्यामध्ये कर्नाटकातील बस यंत्रणा आणि खासगी वाहतूकदारही बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शुक्रवारी कर्नाटकातील पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलिटर दरामध्ये सर्वसाधारणपणे 50 पैशांची वाढ झाली आहे. यामुळे सरकारी परिवहन यंत्रणा बसमध्ये सहभागी होणार असून त्यात बीएमटीसी, केएसआरटीसी, वायव्य परिवहन, एनई केआरटीसी आदी संस्थांचा समावेश असणार आहे. एआयटीयुसीशी संलग्न कामगार संघटना आणि राज्य वाहतूक कर्मचारी फेडरेशननेही या बंदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. फेडरेशनचे जनरल सेपेटरी अनंत सुब्बाराव यांनी इंधन दरवाढीवर विरोध दर्शविण्यासाठी हा बंद महत्त्वाचा असून यामध्ये सर्व कर्मचारीवर्गाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.  

Related posts: