|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वायव्य परिवहनची 20 टक्के दरवाढ

वायव्य परिवहनची 20 टक्के दरवाढ 

प्रतिनिधी/ बेळगाव

गणेशोत्सव काळात वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्यावतीने प्रवाशांच्या सोयीसाठी वाढीव बससेवा उपलब्ध केली जाणार आहे. या सेवेसाठी दूरच्या मार्गावरील प्रवासाचा तिकीट दर 20 टक्क्मयांनी वाढविण्यात येणार आहे. ही वाढ केवळ गणेशोत्सव काळापुरतीच मर्यादित असणार असून 100 रुपये तिकीट असलेल्या ठिकाणी 120 रुपये तिकीट द्यावे लागणार आहे.

विभागीय नियंत्रणाधिकारी एम. आर. मुंजी यांनी ही माहिती दिली. दरवषी सण आणि उत्सव काळात वाढीव बससेवा पुरविताना परिवहन महामंडळ काही प्रमाणात तिकीट दरवाढ करते. यावषी 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय महामंडळाच्या मुख्यालयाने घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली असून जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

मुंबई, पुणे, बेंगळूर, हैदाबाद आदी शहरांना प्रामुख्याने जादा बससेवा पुरविल्या जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही दरवाढ असणार आहे. एकीकडे खासगी प्रवासी माध्यमांनी पाच ते सात पटीने आपले तिकीट दर वाढविलेले असताना महामंडळाची दरवाढ परवडण्यासारखी आहे. यामुळे प्रवाशांना अल्पदरात प्रवास करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मागील काही वर्षांपासून तिकीट दरात वाढ करण्याच्या खासगी माध्यमांच्या धोरणामुळे प्रवासीवर्गाची प्रचंड आर्थिक लुट होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी महत्त्वाच्या मार्गांवर तसेच आरक्षण होईल त्याप्रमाणे बसफेऱया वाढविण्याचे काम वायव्य परिवहनतर्फे केले जात असून जादा लुट करून न घेता या बससेवेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.