|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » सुप्रीम कोर्ट आमचेच,राम मंदिर आम्हीच उभारणार : भाजपा आमदार

सुप्रीम कोर्ट आमचेच,राम मंदिर आम्हीच उभारणार : भाजपा आमदार 

ऑनलाईन टीम / लखनऊ :

लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या काही तोंडावर आली असताना, भाजपाने पुन्हा राम मंदिराचा राग आळवला आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा तयार करण्याचे विधान नुकतेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी केले. आता याच मुद्यावर उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने वादग्रस्त विधान केल्याचे समोर आले आहे. सुप्रीम कोर्ट आमचेच आहे. त्यामुळे राम मंदिर आम्ही उभारणारच, असे उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांनी म्हटले आहे.

बहराईचमधील केसरगंज विधानसभेचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपा आमदार आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री मुकुट बिहारी वर्मा यांना राम मंदिराच्या उभारणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना वर्मा यांनी सुप्रीम कोर्ट आमचेच आहे. त्यामुळे राम मंदिर आम्ही उभारणारच, असे म्हटले. ‘भाजपा विकासाच्या मुद्यावर सत्तेवर आला. तरीही राम मंदिराची उभारणी होणार. कारण तो आमचा संकल्प आहे. मुकुट बिहारी वर्मा फक्त न्यायालयावरच थांबले नाहीत. त्यापुढे जात न्यायपालिका, प्रशासन, देश आणि मंदिर आमचे आहे, असेही ते म्हणाले या विधानावरुन वाद होताच वर्मा यांनी सारवासारव केली. ‘आपण देशाचे नागरिक आहोत. त्यामुळे आपला देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, असा आपल्या विधानाचा अर्थ होता,’ अशा शब्दांमध्ये त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. न्यायालय आमच्या सरकारचे आहे असे मी म्हटले नाही, असे स्पष्टीकरणही वर्मा यांनी दिले.

Related posts: