|Thursday, April 18, 2019
You are here: Home » Top News » तक्रार मागे न घेतल्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण

तक्रार मागे न घेतल्याच्या कारणावरून तरूणाला बेदम मारहाण 

ऑनलाईन टीम / पिंपरी :

तीन वर्षांपूर्वी मोक्काच्या दिलेल्या तक्रारीमध्ये आरोपींवर कायदेशीर कारवाई झाली. याचा राग मनात धरून मोक्काची तक्रार मागे न घेतल्यावरून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना पिंपरीत रात्री नऊच्या सुमारास नेहरूनगर मधील संतोषी माता चौकात घडला आहे.

लखन रघुनाथ पवार यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज विटक, हर्षल उर्फ गबऱया पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लखन पवार यांनी 2015 मध्ये विटकर विरोधात मोक्काची तक्रार दिली होती. त्यामध्ये त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली. गुन्ह्यातील शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याची सुटका झाली. परंतु त्याचा राग मनात धरून विटकर आणि हर्षल या दोघांनी लखन यांना ‘तुझ्यामुळे आमची तीन वर्ष वाया गेली. तुला लय माज आलं का’ असे म्हणत मारहाण केली. हर्षल याने लोखंडी फायटरने लखन यांच्या तोंडावर मारले. यावेळी लखन यांचा मित्र विशाल भोसले आणि आजूबाजूचे नागरिक भांडण सोडविण्यासाठी गेले असता, विटकर याने लोखंडी कोयता हवेत फिरवून ‘कोणी समोर आले तर त्याचे हात पाय तोडून टाकेल.’ अशी धमकी दिली. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अधिक तपास करीत आहेत.

Related posts: