|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

ऑनलाईन टीम / यवतमाळ :

यवतमाळमध्ये आज सकाळी 11 वाजता एका शेतकऱयाने आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करणाऱया शेतकऱयाचे नाव विजय विश्वनाथ पारधी (52) असे असून मनपूर येथे ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाच एकर शेतीचा मालक असलेल्या विजय यांच्यावर बँकेचे 80 हजाराचे कर्ज आहे. त्यांना चार मुली असून दोन मुलींचा विवाह झाला आहे. तर अन्य दोन मुली शिक्षण घेत आहे. मागील वषीच्या गुलाबी बोंडअळीच्या नुकसान भरपाईचे पैसे बँकेत आले. या पैशासाठी ते गेल्या आठ दिवसांपासून बँकेत येरझारा मारत होते. मात्र पोळय़ाचा सण येवूनही बोंडअळीच्या मदतीची रक्कम पदरी न पडल्याने ते निराश झाले. अखेर त्यातच ऐन पोळय़ाच्या दिवशी त्यांनी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.