|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » बँक अधिकारी सिद्धार्थ संघवी यांची हत्या, चार जणांना ताब्यात

बँक अधिकारी सिद्धार्थ संघवी यांची हत्या, चार जणांना ताब्यात 

ऑनलाईन टीम / मुंबई :

एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांचा खून झाल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी जाहीर केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी नवी मुंबईतून एका संशयित आरोपीला अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेले संघवी यांची कार एका निर्जन स्थळी सापडली होती. कारवर रक्ताच्या खुना होत्या. त्यानंतर त्यांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू असून अटक करण्यात आलेल्याची कसून चौकशी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ संघवी हे मलबार हिल परिसरात कुटुंबासमवेत राहतात. बुधवारी रात्री ते ऑफिस सुटल्यानंतर लोअर परळवरुन मलबार हिलकडे, घराकडे निघाले होते. ऑफिसमधून बाहेर पडताना वॉचमनने त्यांना पाहिलंही होते. मात्र ते घरापर्यंत काही पोहोचलेच नाहीत. बराच वेळ ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन लावून चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद होता. रात्रभर शोधाशोध करुन, वाट पाहिल्यानंतर कुटुंबीयांनी दुसऱया दिवशी एन एम जोशी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास चालू केला असता, शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ यांची कार नवी मुंबईतील कोपरखैराणे परिसरात आढळली. या गाडीत रक्ताचे डाग होते. अखेर आज ही नवी माहिती पोलिसांना मिळाली आहे.