|Saturday, July 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » वक्रतुंड महाकायला अवधूत-आदर्शचा स्वरसाज

वक्रतुंड महाकायला अवधूत-आदर्शचा स्वरसाज 

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ…. गणेशोत्सव अगदी उंबरठय़ावर आहे आणि सागरिकाने महाराष्ट्राच्या या लाडक्या गणरायाचं स्वागत याच शब्दात केलं आहे. सागरिका म्युझिकने वक्रतुंड महाकाय या खास गाण्याचा व्हिडीओ गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर नुकताच लाँच केला आहे.

या व्हिडिओचं दिग्दर्शन सागरिका दास यांनी केलं आहे. मराठी संगीत क्षेत्रातील दोन आघाडीच्या आणि रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या अवधूत गुप्ते आणि आदर्श शिंदे या दोघांच्या दमदार आवाजात हे गीत संगीतबद्ध करण्यात आले आहे. या व्हिडीओमध्ये ‘काहे दिया परदेस’ फेम ऋषी सक्सेना आणि ‘घाडगे आणि सून’मधील रिचा अग्निहोत्री आणि नवोदित कलाकार निरंजन जोशी यांनी आपली उत्तम अदाकारी दाखवली आहे. लगबग चालली, सारखं गोड अविट चालीचं सुपरहिट गीत देणाऱया सुहित अभ्यंकरने हे गीत संगीतबद्ध केलं आहे. पारंपरिक ढोल, ताशा, तुतारी या वाद्यांसोबत गिटारचा सुंदर मिलाफ या गाण्यात आहे. नचिकेत जोग यांनी गाण्याचे साधेसोपे, अर्थपूर्ण आणि आजच्या परिस्थितीला साजेसे असे शब्द लिहिले आहेत. सागरिका म्युझिकच्या ऑफिशिअल युटय़ुब चॅनेलवर आपल्याला हा व्हिडीओ पाहता येईल.