|Thursday, June 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘तुला पाहते रे’मुळे सुबोधच्या आठवणींना उजाळा

‘तुला पाहते रे’मुळे सुबोधच्या आठवणींना उजाळा 

झी मराठी वरील नवीनच सुरू झालेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका सध्या गाजतेय. या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची प्रेमकथा सगळय़ांच्या पसंत पडत आहे. वय विसरायला लावणाऱया या मालिकेचा एक वेगळाच योगायोग सुबोध भावे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. या फोटोत सुबोधच्या हस्ते एका लहान मुलीला बक्षीस मिळाल्याचं आपण पाहू शकतो. विशेष म्हणजे ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून गायत्री दातार आहे.

  हा फोटो शेअर करताना सुबोधने एक पॅप्शन लिहिलं आहे- दुनिया गोल हैं…. काही वर्षांपूर्वी एका स्पर्धेमध्ये एका लहान मुलीला माझ्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. तेव्हा ती म्हणाली की, मला पण तुमच्याबरोबर काम करायचंय. मी म्हणालो, नक्की आणि अचानक एक दिवशी ‘तुला पाहते रे’च्या सेटवर तिची गाठ पडली आणि तिने मला या प्रसंगाची आठवण करून दिली. मी थक्क! ती मुलगी म्हणजे तुमच्या सगळय़ांची आवडती ईशा म्हणजेच गायत्री दातार स्वप्नांवरचा माझा विश्वास अजूनच वाढला, असे सुबोध म्हणाला.

 मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी ईशा निमकर सर्वांनाच आवडत आहे. ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या वयातील अंतर ही या मालिकेची जमेची बाजू. गंमत म्हणजे खऱया आयुष्यातही गायत्री आणि सुबोध भावे यांच्या वयात बरंच अंतर असून देखील या दोघांची केमेस्ट्री हिट ठरत आहे.