|Thursday, July 18, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय हॉकी संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण

भारतीय हॉकी संघाच्या नव्या जर्सीचे अनावरण 

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

आगामी होणाऱया पुरूष हॉकीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघातील खेळाडूंना नवी जर्सी उपलब्ध करून दिली जाणार असून शुक्रवारी मुंबईत या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले.

28 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान पुरूषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा येथील कलिंगा स्टेडियमवर खेळविली जाणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी भारतीय पुरूष हॉकीपटूंसाठी नवी जर्सी दिली जाणार आहे. या जर्सीचे डिझाईन फॅशन डिझाईयनर नरेंद्रकुमार यांनी केले आहे. या जर्सीवर हॉकी या क्रीडाप्रकाराला मिळणाऱया प्रोत्साहानाचे डिझाईन करण्यात आले आहे. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय क्रीडाप्रकार म्हणून ओळखला जातो. या नव्या जर्सीवर ओदिशातील कोनार्क येथे असलेले सुर्य मंदिराचे चित्र असून सुर्य रेखाटून भारतीय हॉकी संघाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न डिझायनरने केला आहे. याप्रसंगी भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग, माजी हॉकीपटू अजितपाल सिंग, अशोककुमार, धनराज पिले, दिलीप तिर्की, संदीप सिंग उपस्थित होते. या नव्या जर्सीमुळे भारतीय हॉकी संघाला या आगामी महत्त्वाच्या स्पर्धेत अधिक प्रोत्साहन मिळेल, अशी आशा कर्णधार पी.आर.श्रीजेशने व्यक्त केली.