|Tuesday, December 11, 2018
You are here: Home » क्रिडा » भारत, पाकविरुद्धच्या हाँगकाँगच्या सामन्यांना वनडे दर्जा

भारत, पाकविरुद्धच्या हाँगकाँगच्या सामन्यांना वनडे दर्जा 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

संयुक्त अरब अमिरातमध्ये 15 सप्टेंबरपासून खेळविल्या जाणाऱया आशिया चषक वनडे क्रिकेट स्पर्धेत हाँगकाँगविरुद्धचे भारत आणि पाकच्या सामन्यांना आयसीसीने वनडे दर्जा दिला असल्याचे बीसीसीसीआयने सांगितले.

हाँगकाँग हा देश आयसीसीचा संलग्न सदस्य असून त्यांना अद्याप वनडे दर्जा मिळालेला नाही. आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र फेरीच्या स्पर्धेत हाँगकाँगने संयुक्त अरब अमिरातचा पराभव केल्याने त्यांना आशिया चषकात खेळण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान संयुक्त अरब अमिरातला अलिकडेच आयसीसीचा वनडे मानांकन दर्जा मिळाला आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत, पाक, हाँगकाँग यांचा अ गटात समावेश आहे. तर ब गटात लंका, बांगलादेश आणि अफगाण हे संघ आहेत. हाँगकाँग आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 16 सप्टेंबरला तर हाँगकाँग भारत यांच्यातील सामना 18 सप्टेंबरला खेळविला जाणार आहे.

Related posts: