|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » क्रिडा » संजू सॅमसनचा विवाह डिसेंबरात

संजू सॅमसनचा विवाह डिसेंबरात 

वृत्तसंस्था/कोची

केरळचा यष्टीरक्षक आणि फलंदाज संजू सॅमसनचा येत्या डिसेंबरमध्ये विवाहबद्ध होणार आहे. महाविद्यालयातील मैत्रिणीसमवेत विवाह करणार असल्याची माहिती सॅमसनने प्रसार माध्यमाला दिली.

23 वर्षीय संजू सॅमसन आणि चारू यांच्यात गेली पाच वर्षे मैत्रीचे संबंध आहेत. आता मैत्रीचे रूपांतर विवाहात होणार आहे. अलिकडे संजू सॅमसनने चारूसमवेतचे छायाचित्र आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. 2013 साली सॅमसनने आयपीएल स्पर्धेत पदार्पण केले असून 2018 साली त्याने या स्पर्धेत राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधीत्व केले होते. संजू सॅमसन आणि चारू यांचा विवाह 22 डिसेंबरला होणार असल्याची माहिती चारूचे वडील बी.रमेशकुमार यांनी दिली आहे.

Related posts: