|Thursday, April 18, 2019
You are here: Home » क्रिडा » चित्राला चौथे तर जिन्सनला सातवे स्थान

चित्राला चौथे तर जिन्सनला सातवे स्थान 

वृत्तसंस्था/ ओस्ट्राव्हा

झेक प्रजासत्ताकमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय हौशी ऍथलेटिक फेडरेशनच्या (आयएएएफ) आंतरखंडीय चषक ऍथलेटिक्स स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताच्या पीयु चित्राला महिलांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तसेच पुरूषांच्या 800 मी. धावण्यांच्या शर्यतीत जिन्सनला सातवे स्थान मिळाले.

जकार्तातील आशियाई क्रीडा स्पर्धेत चित्राने महिलांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत कास्यपदक मिळविले होते. तथापि तिने या क्रीडाप्रकारात 4 मिनिटे, 18.45 सेकंदाचा अवधी घेतला. तिला चौथे स्थान मिळाले. या क्रीडाप्रकारात केनियाच्या चिबेटने सुवर्णपदक मिळविताना 4 मिनिटे, 16.01 सेकंदाचा अवधी घेतला. अमेरिकेच्या हुलहेनने रौप्यपदक व मोरोक्कोच्या अराफीने कास्यपदक मिळविले. पुरूषांच्या 800 मी. धावण्यांच्या शर्यतीत केनियाच्या कोरिरने 1 मिनिट, 46.50 सेकंदाचा अवधीत सुवर्णपदक पटकाविले. जिन्सनने 1 मिनिट, 48.44 सेकंदाचा अवधी घेत सातवे स्थान मिळविले. जकार्तातील आशियाई स्पर्धेत जिन्सनने या क्रीडाप्रकारात रौप्यपदक मिळविले होते.

Related posts: