|Saturday, April 20, 2019
You are here: Home » क्रिडा » समीर वर्मा अंतिम फेरीत

समीर वर्मा अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था/ हैद्राबाद

हैद्राबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत टॉप सीडेड बॅडमिंटनपटू समीर वर्माने पुरूष एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात समीर वर्माने गुरूसाईदत्तचा 16-21, 21-15, 21-11 असा पराभव केला.

75 हजार डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या बीडब्ल्यूएफ टूर सुपर 100 स्पर्धेत वर्माने उपांत्य फेरीचा सामना 51 मिनिटात जिंकला. आता वर्मा आणि मलेशियाचा व्हेन यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. मलेशियाच्या व्हेनने उपांत्य सामन्यात इंडोनेशियाच्या सातव्या मानांकित खोलिकचा 21-17, 21-14 असा पराभव केला. या स्पर्धेत भारताच्या एस.रेनिकरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरूष दुहेरीची अंतिम फेरी गाठताना आपल्याच देशाच्या अरूण जॉर्ज आणि एस. शुक्ला यांचा 21-14, 21-6 असा पराभव केला.

 

Related posts: