आशिया चषकासाठी समालोचकांच्या यादीतून हर्षा भोगले, मांजरेकरांना वगळले

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
15 सप्टेंबरपासून युएईत होणाऱया आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी समालोचकांची यादी आशियाई क्रिकेट परिषदेने रविवारी जाहीर केली. या यादीतून समालोचनासाठी प्रसिध्द असलेल्या हर्षा भोगले यांचे नाव वगळले आहे. यासोबत संजय मांजरेकर यांनाही या यादीत स्थान मिळवता आलेले नाही. भारताकडून सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन व व्हीव्हीएस लक्ष्मण यांना स्थान मिळाले आहे. याशिवाय, पाकिस्तानचे रमीज राजा, अमीर सोहेल तसेच श्रीलंकेचे कुमार संगकारा, रसेल अरनॉल्ड यांचा, बांगलादेशच्या अथल अली खान यांचा समावेश करण्यात आला आहे. पाहुणे समालोचक म्हणून आशियाई क्रिकेट परिषदेने डीन जोन्स व ब्रेट ली व केविन पीटरसन यांना आमंत्रित केले आहे.
Related posts:
Posted in: क्रिडा