|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मल्टिस्टेटमुळे दूध उत्पादकांना फायदाच

मल्टिस्टेटमुळे दूध उत्पादकांना फायदाच 

प्रतिनिधी/ गडहिंग्लज

गोकूळ दूध संघ हा बहूउद्देशीय असल्याने मल्टिस्टेट करण्याचा प्रस्ताव वार्षिक सभेसाठी ठेवण्यात आला आहे. पण राजकीय गैरसमज पसरविले जात असून त्यावर सभासदांनी विश्वास ठेवू नये. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्याय माध्यामातून 110 कोटी कर्ज घेवून गोकूळची क्षमता 20 लाख लीटर करण्याचा मानस संस्थेचा आहे. जिल्हा दूध संघाच्या सभासद संस्थेला कोणतीही बाधा पोहचणार नाही असे प्रतिपादन गोकूळचे संचालक रामराज कुपेकर यांनी केले.

  गडहिंग्लज तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधीच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन विश्वास पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक करताना श्री. कुपेकर म्हणाले, संस्थेच्या प्रतिनिधीना वार्षिक सभेला उपस्थिती राहून प्रश्न मांडता येत नाहीत त्यामुळे संपर्क सभेचे आयोजन केले आहे. यावेळी गोकूळच्या सर्व योजनांची माहिती त्यांनी दिली.

  चेअरमन विश्वास पाटील बोलताना म्हणाले, गडहिंग्लज तालुक्यातील 66 टक्के म्हैस तर 34 टक्के गाय दूधाचा पुरवठा होतो. संघाला म्हैस दुधाची सर्वाधीक गरज असून दूध उत्पादकानी जास्तीत जास्त दूधाचा पुरवठा करावा असे आवाहन केले. गोकूळची वार्षिक उलाढाल 2100 कोटी असल्याचे त्यांनी वेळी सांगितले. यावेळी तालुक्यातून जास्त दूध पुरवठा करणारी संस्थेचा सत्कार करण्यात आला. यामध्ये किसान दूध संस्था मुगळी, लक्ष्मी दूध संस्था बसर्गे, हनुमान दूध संस्था मुगळी, चाळोबा दूध संस्था वैरागवाडी, तानाजी मोकाशी दूध संस्था नांगनूर, महालक्ष्मी दूध संस्था कडगले यांच्या सत्कार प्रमाणपत्र व धनादेश देवून गौरविण्यात आले. याशिवाय महिला दूध संस्थेत सर्वाधिक दूध पूरवठा केल्याबद्दल महालक्ष्मी दूध संस्था खमलेट्टी यांच्याही प्रमाणपत्र व धनादेश देवून गौरविण्यात आले. यावेळी संकलन, पशूसंवर्धन, पशूखाद्य आदी बाबत संस्थेच्या अडीअडचणीच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.

  सभेला संचालक विश्वास जाधव, बाळासाहेब खाडे, अमरिशसिंह घाटगे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, आर. सी. शहा, रमेश आरबोळे, बाबासो पाटील, रघुनाथ् पाटील, केदारबाबा नाडगोडा, आंनदा पोवार, जब्बार मुल्ला, बाबूराव चौगुले, राजेंद्र मोकाशी, मलगोंडा पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते. संचालक राजेश पाटील यांनी आभार मानले.