|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयात स्वाईन फ्लूचा आणखी बळी

साताऱयात स्वाईन फ्लूचा आणखी बळी 

प्रतिनिधी/ सातारा

मल्हारपेठेतील रिक्षा चालक आणि वीरशैव कक्कया समाजाचा कार्यकर्ता असलेल्या महेंद्र तपासे (वय 38) याला शनिवारी पहाटे सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, स्वाईन फ्ल्यू सारख्या आजाराची लक्षणे असताना सहा तास उपचार न मिळाल्यामुळे पुण्याला नेण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यात आले तेथे त्याची अवस्था गंभीर झाल्याने पुण्याला ससूनमध्ये उपचारासाठी नेत असताना उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर उपचार करण्यात आरोग्य यंत्रणाकडून हेळसांड झाली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

सिव्हील हॉस्पिटल, पोलीस आणि नातेवाईक यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र तपासे हा युवक रिक्षा चालक असून गेल्या आठ दिवसांपासून तो ताप आल्याने आजारी होता. शनिवार 8 रोजी छातीत दुखत असल्याने त्याला सिव्हील हॉस्पिटलमध्ये पहाटे 4 वाजता दाखल करण्यात आले. मात्र, स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असूनही सकाळी 11 वाजेपर्यंत उपचार न मिळाल्याने डॉ. यशवंत पाटील यांच्या यशश्री रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. मात्र, पेशंटच्या घरच्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मेडिसिनचे साडेपाच तर रुग्णालयाचे 14 हजार भरून पेशंटला पुण्याला नेण्यास सांगण्यात आले. सात हजार खर्ची करून खाजगी रुग्णवाहिकेतून त्याला गंभीर अवस्थेत पुणे येथील ससून रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान, शासकीय रुग्णालयाची रुग्णवाहिका बाहेर दिली जात नाही, असे त्यावेळी सांगण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शनिवारी दु. 3 वा. महेंद्रला पुण्याला नेण्यात आले. मात्र, 5 वा. महेंद्र मयत असल्याचे ससून येथील डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे खाजगी दवाखान्यातील डॉक्टर आणि रुग्णवाहिकेसह आलेल्या डॉक्टरच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित होत आहे.

दरम्यान, मयत महेंद्रच्या मृतदेहावर शनिवारी रात्री उशिरा सिव्हीलमध्ये पोस्टमार्टेम करण्यात आले. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यात आला आणि त्यानंतर मयतावर माहुलीत अंत्यसंस्कार झाले. स्वाईन फ्ल्यूसारखा पेशंट सिव्हीलमध्ये दाखल झाला असताना स्वॅप काढला जात नाही आणि बॉडी आल्यानंतर मरणोपरांत प्रक्रिया केली जाते. वेळेत उपचार मिळाले असते तर जीव वाचला असता, असा आरोप महेंद्रच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र, मेल्यानंतरही न्याय मिळत नसल्याने बॉडी सिव्हीलच्या आवारात असताना चार तास पीएम आणि प्रक्रिया करण्यासाठी लागतात, हे वेदनादायी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.  सिव्हीलमध्ये उपचार व्यवस्थित मिळत नसल्याने यशश्री रुग्णालय दाखल महेंद्रवर नेमके कोणते उपचार झाले हे गुलदस्त्यात असताना पुण्यात पोहोचवण्यापूर्वीच महेंद्रचा अंत झाला होता, असे ससूनच्या वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले.

Related posts: