|Sunday, April 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आजच्या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे

आजच्या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे 

प्रतिनिधी/ सातारा

2014 च्या निवडणूकीवेळी मोदींनी जनतेला जी दिवास्वप्न दाखवली होती ती शेतकयांना कर्ज माफी, प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख येतील. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. अनेक निर्णय चुकीचे घेतले गेले. गेल्या चार वर्षात जनतेला वेठीस धरले आहे. काँग्रेस व समविचारी पक्षांनी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी पुकारलेल्या बंदमध्ये सर्वसामान्य जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, काँग्रेसचे सातारा शहराध्यक्ष रवींद्र झुटिंग, महिला जिल्हाध्यक्ष धनश्री महाडिक, ऍड. विजयराव कणसे, युवक काँग्रेसचे दयानंद भोसले आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना आनंदराव पाटील म्हणाले, अनेक वेळा गोड खाल्लं की खर्डा खावा वाटतो.तसा भाजपा सरकारचा खर्डा जनता आस्वाद घेत आहे.जन संघर्ष यात्रेची कोल्हापूर येथून चांगली सुरुवात झाली. कराडमध्ये भाजपने ज्या वेदना दिल्या त्याची दहिहंडी फोडली.पुणे येथे समारोप झाला. अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे- पाटील, मल्लिकार्जुन खरगे, पृथ्वीराज चव्हाण ही मान्यवर मंडळी होती. सद्याच्या भाजपा-सेनेच्या सरकारने सर्वसामान्य लोकांचे जीने हराम केले आहे. पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत. येत्या काही दिवसात पेट्रोल,डिझेल च्या किमती भरमसाठ वाढत आहेत. सरकारचे कसलेही नियोजन  नाही.जीवनावश्यक वस्तू पासून सर्वच महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती कमी असताना इकडे देशात तेलाच्या किमती वाढल्या. व्यापायांना ही हाल सोसावे लागत आहे. उध्वस्त सर्वसामान्य वर्गाला केले आहे. पुकारलेल्या बंद मध्ये समविचारी पक्ष सहभागी होणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

सुनील माने म्हणाले, या सरकारने कोणताच प्रश्न नीट सोडवला नाही. कर्जमाफी आर्थिक वर्षात द्यायला हवी होती. सरसकट दिली गेली नाही. अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण आजही भिजत ठेवले आहे. नोटबंदीचा निर्णय घेताना अनेक बाबी चुकीच्या झाल्या.यांना सरकार चालवता येत नाही. असा आरोप करत उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हा असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन चोरसारखे केले

आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत बांधली. पण या इमारतीचे उद्घाटना निमंत्रण साधे दिले नाही.पत्रिकेत नावे न सांगता घातली गेली. भाजपावाल्यानी चोरासारखे उदघाटन केले. पाला अन माग गाजर हे सरकार दाखवत आहे, असा आरोप ही आनंदराव पाटील यांनी केला.

Related posts: